नंदुरबार l प्रतिनिधी
मुस्लिम खाटीक समाज व सेवाभावी संस्थेतर्फे आज गुरुवारी सहावा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात २५ जोडप्यांच्या विवाह लावण्यात येणार आहे.
नंदुरबार येथील बादशहा नगरातील सामाजिक सभागृहात आज गुरुवार (दि.११) जानेवारी रोजी मुस्लिम खाटीक समाज व सेवाभावी संस्थेच्या वतीने सहावा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,मुस्लिम खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, महाराष्ट्र, गुजरात समाजाध्यक्ष युसुफ हाजी लतीफ खाटीक
माजी आ.शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचा ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक, मुस्लिम खाटीक माजी समाजाध्यक्ष ए. एल शेख, शिवसेनेचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष परवेज खान, महाराष्ट्र, गुजरात खाटीक समाज उपाध्यक्ष अ.रऊफ खाटीक, धुळ्याचे समाजाध्यक्ष असरार खाटीक, प्रदेश उपाध्यक्ष हारून खाटीक, उद्योजक अल्ताफ मेमन, शहराध्यक्ष हबीब खाटीक, माजी जिल्हाध्यक्ष गुलाम नवी शेख मुसा खाटीक, इमाम शाही मस्जिदचे मौलाना मुशफिक आलम उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन मुस्लिम खाटीक समाज व बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.