म्हसावद । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे 51 राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडी , जिल्हा सिंधुदुर्ग येथे रविवार दि. 7 जानेवारी 2024 रोजी उत्साहामध्ये संपन्न झाले .
या अधिवेशनासाठी राज्यातून शिक्षकेतर कर्मचारीची मोठी उपस्थिती होती नाशिक विभागातील जळगाव,धुळे, नंदुरबार व नाशिक जिलयातील राज्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील शेकडो शिक्षकेतर कर्मचारी बांधव व भगिनीं या राज्य अधिवेशनास उपस्थित होते .
सकाळ सत्रामध्ये अधिवेशनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे व कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले .शाळेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या १२/ २४ आणि १०/२०/३० योजनेचा लाभ येत्या जानेवारीअखेर मिळवून देण्याबाबत तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्या बाबत आम्ही शासन दरबारी जोरदार प्रयत्न करू असे आश्वासन या दोन्हीही आमदारानी दिले. महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी महामंडळाने या वर्षांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील दिशा आणि धोरणाबाबत तसेच भविष्यात आपल्या संघटनेचे कार्य बाबत उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले .
कालबद्ध आणि आश्वासित प्रगती योजना तसेच शाळेच्या शिक्षकेतर भरती सुरु होणे याबाबत महामंडळाकडून आजपर्यत करण्यात आलेले प्रयत्न याबद्दलची माहिती आणि येत्या महिन्याभरात हा प्रश्न जर सुटला नाही तर आंदोलनाची भूमिका विशद करून हे अधिवेशन सिंधुदुर्गला का ठेवण्यात आले या मागचा हेतू त्यांनी यावेळी स्पष्ट करून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराजवळच हे अधिवेशन असल्यामुळे शिक्षकेतरांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांनी मागणी मान्य केलीच पाहिजे यासाठी ही अधिवेशन सिंधुदुर्ग आयोजित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वेळप्रसंगी शासनाने जर मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये व येणाऱ्या 10 वी 12 वी परीक्षेमध्ये शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी आपला काय दबाव आहे हे दाखवून देईल परंतु शासनाने ती वेळ येऊ न देण्याची विनंती सुद्धा शिवाजीराव खांडेकर सरानी केली.महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने तसेच कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . व्यासपीठावर सर्व राज्य पदाधिकारी उपस्थित होते
सायंकाळच्या सत्रात राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सर्व शाळेचे शिक्षकेतर बांधवांना व भगिनींना उत्साह वाढवणारी ठरली
मंत्रीमहोदयानी येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न अर्थ विभागाशी चर्चा करून निकाली काढू असे ठोस आश्वासन दिले.
हे महत्त्वाचे मिळालेले आश्वासन सर्व शाळेच्या शिक्षकेतर बांधवांना निश्चितच उत्साह वाढवणारे असुन गेल्या कित्येक दिवसांची मागणी मान्य होईल ही नवी आशा निर्माण करणारी आहे .
सिंधुदुर्ग शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन करून हे अधिवेशन यशस्वी करून दाखवले . त्याबद्दल सिंधुदुर्ग च्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
तसेच सर्व राज्य पदाधिकारी आणि त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या टीमचे डी पी महाले नाशिक विभागीय कार्यवाह राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे महामंडळ नाशिक विभाग नाशिक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.पुढील ५२ वे राज्य अधिवेशन चंद्रपूर येथे घेण्याबाबत निर्णय झाला.








