म्हसावद । प्रतिनिधी
प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेला रथ श्री राम अक्षता कलश…ढोल ताशांचा गजर…’जय श्रीराम’चा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करीत गावातील श्री राम मंदिरापासून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली.
यावेळी गावातील तरुण वर्गात मोठा उत्साह दिसून आला.या यात्रेचे गावात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. या कळस यात्रे साठी म्हसावद ग्रामस्थ, पोलीस निरीक्षक रांजन मोरे , विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शहादा तालुका पदाधिकारी यांनी हजेरी लावत कलस यात्रेची शोभा वाढवली.सदर शोभा यात्रा राम मंदिर, अहिल्याबाई चौक,मुख्य बाजारपेठ, कुबेर हायस्कूल, नवा व जुना प्लॉट, कुबेर हायस्कूल, नवा व जुना प्लॉट, अनेकवाडा आदी ठिकाणी काढण्यात आली या यात्रेत म्हसावद व परिसरातील नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.








