नंदुरबार l प्रतिनिधी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा-2024 शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी होणार असून या परिक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करुन घ्यावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी जेएनव्हीएसटी-2024 साठी अर्ज केले आहे. अशा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या लिंकवरुन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. यावर्षी जवाहर नवादेय विद्यालय प्रवेश परिक्षा-2024 नंदुरबार तालुक्यातील 4 व नवापूर तालुक्यातील 3 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासोबत शाळेचे ओळपत्र अथवा आधारकार्डची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे.
प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी अडचण आल्यास जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी तालुका नवापूर येथे संपर्क साधावा असेही प्राचार्य श्री. कोसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








