नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघ पत्रकारांवर संकट आल्यास किंवा अन्याय झाल्यास पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा संघ आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी पत्रकार दिनानिमित्त बोलताना केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे काल दि.६ जानेवारी रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन व पत्रकारांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.
नेहरू नगरातील पत्रकार भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, बाबा राजपूत, मनोज शेलार, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, पत्रकार परिषद समन्वयक विशाल माळी, अविनाश भामरे, पत्रकार जगदीश सोनवणे, साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे, हंसराज चौधरी, गौतम बैसाणे, फोटोग्राफर नितीन पाटील, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पत्रकारांना आयुष्यमान कार्ड वाटप
यानंतर पत्रकार बांधवांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार कै.रविंद्र चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक मनोज गायकवाड व विद्यार्थी परिषद पदाधिकारी यांनी पत्रकारांना भेटवस्तू देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दिपक कुलकर्णी, मनोज शेलार, अभिषेक राजपूत, जगदीश सोनवणे, हंसराज चौधरी, नरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी म्हणाले की, अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वांना सोबत घेत संघाचे काम केले आहे. कोरोना काळात पत्रकार बांधवांना कोवीडचे लसीकरण केले.
पत्रकारांचा अपघात विमा काढला. पत्रकारांच्या संकटं काळात सर्व पत्रकार एकत्रितपणे उभे राहिलो. मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली. पत्रकार संघाचे स्वतः चे पत्रकार भवन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, स्थानिक नगरसेवक कुणाल वसावे व कैलास पाटील यांच्या सहकार्याने उभे राहिले आहे. आता यापुढे ही आपण सर्व एकत्रित व संघटितपणे काम करु असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पत्रकार रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश महाजन यांनी केले. यावेळी निलेश पवार, सुर्यकांत खैरनार, कुलकर्णी, देवेंद्र बोरसे,प्रशांत पाटील, बापू ठाकरे, दीपक सोनार, जितेंद्र जाधव, राजेंद्र पवार, रत्नदीप पाटील, प्रविण चौधरी, जीवन माळी, अमित कापडणे, किसन जाधव, चिराग शेख, सुभाष राजपूत, शैलेंद्र ईशी, सतिष गोसावी, देवेंद्र माळी, संजय सोनवणे, वसंत कोडग, आफीक मिर्जा, अजीम हाश्मी, मनोज समशेर, वानखेडे, किशोर गवळी, शैलेंद्र चौधरी, बंटी मोरे, अनिल राठोड, दिनेश सोनवणे, दिपक राजपूत, मुकेश सोमवंशी, विष्णू पाटील, महेंद्र चौधरी, महेंद्र चित्ते, श्री.जव्हेरी, श्री. निकवाडे, मिलींद भालेराव, सुबोध अहिरे, प्रेमचंद राजपूत यांच्यासह दैनिक, साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक मिडिया चे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.








