नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते रिमोटव्दारे दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया
गावित,पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर,मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, बालरोतज्ज्ञ डॉ. समिधा नटावदकर,प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकारे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी डॉ युनुस पठाण, शिक्षण निरीक्षक आर.बी. पाटील,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, जि.प.सदस्य शांताराम पाटील, संस्थाचालक संघटनेचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ जगराम भटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता राजेंद्र महाजन, विनोद लवांडे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपुरचंद मराठे, रोहन नटावदकर, जयदीप नटावदकर, डॉ इद्रिस पठाण, डॉ उमेश भदाणे, डॉ बनसोडे, मनोज मुडळकर, राजेश्वरसिंग पाडवी, डॉ संजय शिंदे, डॉ प्रफुल्ल तेले, डॉ रणजीत गवांदे, उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार उपस्थित होते.
.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला रिमोटच्या सहाय्याने माल्यार्पण करण्यात आले.दीपप्रज्वलन सुद्धा रिमोटच्या सहाय्याने करण्यात आले व अत्यंत अभिनव पद्धतीने PSLV चे लॉन्चिंग करण्यात आले. वरील तिन्ही कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे यांनी केले. स्वागत गीत व विज्ञान गीत विद्यालयाचे संगीत शिक्षक रश्मिकांत त्रिवेदी व विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याने केलेल्या प्रगतीचा अहवाल सांगितला. विज्ञानाच्या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मारलेल्या मजलेचे त्यांनी कौतुक केले. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर कमालीची कामगिरी केली आहे आणि याचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या मनोगतात डॉ.जगराम भटकर यांनी विज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकाचा विकास
करण्यासाठी व्हावा असे प्रतिपादन केले.
डॉ सुप्रिया गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतल्याचा मुख्य फायदा
म्हणजे विद्यार्थ्यांना आपली दिशा ठरविण्यात मदत होते. विज्ञान निरंतर आपले जीवन समृद्ध करते आहे आणि त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.खासदार डॉ हिना गावित यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विज्ञान हा समजून घेण्याचा विषय आहे. विज्ञान आपले जीवन समृद्ध करते. विद्यार्थ्यांनी चौकस बनून विज्ञानाचा अभ्यास केला तर त्याची मदत त्यांना भविष्यात नक्की होईल असेही त्यांनी सांगितले. सहभागीविद्यार्थ्यांनी क्रमांकाला महत्व न देता मेहनत करत राहावी असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी मानले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गटातून 19, माध्यमिक गटातून 22, शिक्षक प्राथमिक गटातून 5, माध्यमिक गटातून 6 व प्रयोगशाळा परिचर गटातून तीन अशी एकूण 55 उपकरणे सामील झाली आहेत.








