म्हसावद l प्रतिनिधी
आज सकाळी10 वाजता शहादा ते धडगांव रस्त्यावरील चिखली फाटा येथे सार्वजनिक जागी गाडीसह सात लाख चोवीस हजाराची दारूची चोरटी वाहतूक करताना म्हसावद पोलीसांनी पकडली आहे.
पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की, आरोपी गणेश कालश्या वळवी (24 )वर्ष, रा. घाटली पोस्ट काकडदा ता. धडगांव हा गाडीत दारूची चोरटी वाहतूक करताना आढळून आला.
यात 20 हजार 400 रू.कि.चे एका कागदी खोक्या मध्ये एकूण 12 नग कॅनॉन 10000 सुपर स्ट्रांग कंपनीची बियर 650 एम एल प्रत्येकी नग छापील किंमत 170/- रूपये प्रमाणे असे एकूण 10 खोके त्यात एकूण 120 काचेची बियर बॉटल,4 हजार 560 रू.कि.चे एका कागदी खोक्या मध्ये एकूण 24 नग कॅनॉन 10000 सुपर स्ट्रांग कंपनीची बियर 330 एम एल प्रत्येकी नग छापील किंमत 95/- रूपये प्रमाणे असे एकूण 02 खोके त्यात एकूण 48 काचेची बियर बॉटल,7 लाख रू.कि.ची एक पांढ-या रंगाची महींद्र कंपनीची XUV-500 तिचा ( क्र. एम एच 39 जे. 9889) एकूण 7 लाख 24 हजर 960 असा माल पकडला आहे.
यातील आरोपी हा विना पास परवानगी शिवाय वर नमूद वर्णनाची व किमंतीची दारू वाहनात चोरटी वाहतूक करतांना आढळून आला म्हणून पोकॉ. प्रविण मधूकर पवार यांच्या फिर्यादवरून म्हसावद पोस्टे प्रोव्ही.गुरनं. 01/2024 महाराष्ट्र दारू. बंदी कायदा कलम 65 (ई) 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पोहेकाँ सुनिल बागूल हे करत आहेत.








