म्हसावद । प्रतिनिधी
राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा नुकतीच मुंबई चेंबूर येथे घेण्यात आली त्या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांचे संघ नंदुरबार नागपूर, ठाणे सिटी, ठाणे ग्रामीण, मुंबई सिटी, मुंबई ग्रामीण, मुंबई उपनगर , बीड, पुणे, रायगड जिल्ह्यातील संघ स्पर्धेत सहभागी झाले होते साखळी पद्धतीचे सामने चार गटात खेळवण्यात आले.गटातून नंदुरबार, ठाणे, नागपूर, सांगली हे संघ सेमी फायनल ला पोहोचले सेमी फायनल बी व डी गटातून नंदुरबार विरुद्ध ठाणे ,ए व सी गटातून सांगली विरुद्ध नागपूर अतिशय चुरशीचे सामने झाले त्यातून अंतिम सामन्यासाठी डी गटातून नंदुरबार व ए गटातून सांगली पुढे आले आणि फायनल बॉक्स लंगडीचा सामना अतिशय अटीतटीने चुरशीने खेळत असताना वन साईड जात असलेला सामना नंदुरबार संघाने दुसऱ्या इनिंगला युक्तिवाद खेळ करून बलाढ्य सांगली संघावर मात करून 3 गुणांनी विजय प्राप्त मिळविला आणि महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात बॉक्स लंगडी या खेळावर नाव कोरले.
नंदुरबार जिल्हा पहिल्यांदाच बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर सहभाग घेतला होता. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रसंगी बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष इंद्रजीतसिंग राठोड यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नंदुरबार जिल्हा बॉक्स लंगडी संघाने स्वीकारले, द्वितीय पारितोषिक सांगली या संघाने मिळविले या कार्यक्रम प्रसंगी बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जनक मारुती हजारे, सचिव आशिष सावंत, खजिनदार श्री. जाधव , नंदुरबार जिल्ह्याचे सचिव करणसिंग चव्हाण, कार्याध्यक्ष शांताराम पाटील, सचिन आव्हाड, शिरीष पवार, अनिकेत, रवी, दीपक सावंत यांच्या उपस्थितीत पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धा पंजाब लुधियाना येथे आयोजित होणार आहे, यात महाराष्ट्राचा संघात नंदुरबार जिल्ह्यातील नेतृत्व करण्यासाठी नगरपालिका शाळा क्रमांक 7 चे खुशाल सचिन भाट, श्रेयस रवी बजरंगे, आदित्य गोरख मलके, के.डी. गावित सैनिकी स्कूल चे शकील काळूसिंग पाडवी, जिग्नेश शांताराम तडवी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर चे अंकित रवींद्र माळी, प्रत्यूष प्रशांत तांबोळी हे खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ नंदुरबार चे उपाध्यक्ष श्रावण चव्हाण व नगरपालिका शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, खाजगी प्राथमिक शाळेचे शिक्षक बंधू भगिनी आणि नंदनगरीचे पालक वर्ग यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








