म्हसावद । प्रतिनिधी:
दि.6 व 7 जानेवारी 2024 ला नंदुरबार शहरात ऑल इंडिया बुद्धिबळ रेटिंग स्पर्धा नंदुरबार डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या
वतीने डॉ. विजयकुमार गावित बुद्धिबळ चषक या नावाने आयोजित करण्यात आले आहे.
देशातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. एक लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस व आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे.या स्पर्धेसाठी AICF व MCA ची नोंदणी आवश्यक असून 5 जानेवारी 2024 पर्यंत ऑन लाईन नोंदणी गुगल फॉर्म भरून करायची आहे.प्रथम 21000 रुपयाचे रोख बक्षीस असून एकूण 34 रोख बक्षिसे , ट्रॉफी व सहभाग प्रमाण पत्र दिले जाणार आहे.सदर स्पर्धा गुरुवारी सराफ बाजार नंदुरबार येथे 6 जानेवारीला सकाळी 9 वाजेपासून सुरू होतील.नागपूर पुणे मुंबई, उज्जैन, इंदूर ,सुरत, धुळे व जळगाव येथील नोंदणी सुरू झाली असून नंदुरबार मधील खेळाडूंनी नावे नोंदवायची आहेत.
स्पर्धेसाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या असून पंच समिती मध्ये जळगाव चे राष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे आहेत. सोबतच नरेंद्र साबुवाला,राहुल खेडकर, मनिलाल चौधरी ,केदार पाटील,नूतन घरटे ,जाधव चंद्रकांत, योगेश रवंदडळे हे सह पंच म्हणून काम पाहणार आहेत.
कार्यकारी समिती मध्ये डॉ.शिरीषकुमार शिंदे, प्रा.डॉ.दिनेश पाटील.प्रा डॉ. दिनेश देवरे,डॉ.वडाळकर,उमेश मराठे,संगीता लखोटिया हे स्पर्धा नियंत्रण चे काम पाहणार आहेत.प्रोजेक्ट चेअरमन म्हणून प्रविण भदाने तर स्पर्धा संचालक म्हणून प्रा.सुभाष मोरावकर हे काम बघणार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक बुद्धिबळ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी केले. स्पर्धकांना रेटिंग मिळविण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे. अधिक माहिती साठी संस्थेच्या कार्यकारिणीशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.








