शहादा l प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहर व परिसरातील विविध सामाजिक,राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
येथील शासकीय विश्रामगृह चौकातील फुले स्मारकस्थळी बुधवार दि.3 जानेवारी रोजी सकाळी विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, हेरंब गणेश मंदिर ट्रस्ट जयनगरचे अध्यक्ष हिरालाल माळी, पंडीतराव माळी, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर,मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे, राजेंद्र अग्रवाल ,
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, माजी नगरसेविका सौ.विद्या जमदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील,शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,सौ.अल्का जोंधळे,सौ.भावना सोनवणे,विठ्ठल पाटील, हितेंद्र वर्मा,प्रशांत कदम,अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,प्रा.नेत्रदीपक कुवर,इंजि.रविंद्र आगळे, पितांबर महाजन, जितेंद्र शिकलीकर आदिंची उपस्थिती होती.प्रास्ताविक पंडितराव माळी यांनी केले.आभार हिरालाल माळी यांनी व्यक्त केले.








