तळोदा l प्रतिनिधी
युवकमित्र परिवार संस्था, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा युवकमित्र पत्रकारिता पुरस्कार यावर्षी तळोदा येथिल पत्रकार हंसराज महाले यांना जाहीर करण्यात आला आहे.निवडीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
पत्रकारीतेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व युवा चळवळीच्या विविध बातम्या तसेच विविध शैक्षणिक,सामाजीक उपक्रमांना वेळोवेळी प्रसिद्धी देत वंचीत घटकाच्या विकासासाठी युवा चळवळ पोहचवण्याचे कार्य यशस्वी पार पाडले आहे. जुन्या बारा वर्षापासून ते पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा कार्याची दखल घेऊन त्याची युवक मित्र परिवार या संस्थेने २०२४ वर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या निवडी बद्दल तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,ईश्वर मराठे, भरत भामरे,विकास राणे,सुधाकर मराठे, दिपक मराठे, सम्राट महाजन,किरण पाटील,नरेश चौधरी, नारायण जाधव, आदीं पत्रकारीतेसह राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.








