नंदुरबार l प्रतिनिधी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे धडक कारवाई करीत दारु पिवून वाहन चालविणाऱ्या 73 इसमांवर कारवाई करण्यात आली.
नवीन वर्षाचे स्वागत व सुरु असलेल्या वर्षाला निरोप देण्यासाठी लहान मुले, पुरुष, स्त्रीया, तरुण यांचेसह वयोवृद् इसम देखील रस्त्यांवर उतरुन आनंदोत्सव साजरा करीत असतात, याच पार्श्वभूमतीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्ष पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली 31 डिसेंबर 2023 रोजीचे सायंकाळी 7 ते 1 जानेवारी 2024 चे सकाळी 5 वा. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी योजना राबविण्यात आली होती.
नाकाबंदीचा मुख्य उद्देश हा नववर्षाच्या स्वागतासाठी आनंदोत्सव साजरा करतांना कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समजाकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असा होता.
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी राबविणेबाबत नियोजन केले. नाकाबंदी दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी, हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्रौ घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे, Drunk and Drive, कारागृहातुन सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांच्याविरुद् कायदेशीर कारवाई करणेबाबत, मालमत्तेविरुध्चे गुन्हे उघडकीस आणणे तसेच वाहनांची तपासणी करणेबाबतच्या सूचना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उप-विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
जिल्ह्यात एकूण 27 ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली. सदर नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 32 पोलीस अधिकारी व 105 पोलीस अमंलदार नेमण्यात आले होते. तसेच नाकाबंदीचे नेतृत्व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः करुन नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांचेसह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.
नाकाबंदी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात एकूण 73 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस दलाकडून सुरु असलेल्या नाकाबंदीमध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे-11, उपनगर पोलीस ठाणे- 4, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-2, नवापूर पोलीस ठाणे- 3, विसरवाडी पोलीस ठाणे- 3, शहादा पोलीस ठाणे-17, धडगांव पोलीस ठाणे-2, म्हसावद पोलीस ठाणे-5, सारंगखेडा पोलीस ठाणे-2, अक्कलकुवा पोलीस ठाणे- 9, तळोदा पोलीस ठाणे- 5, मोलगी पोलीस ठाणे- 2 शहर वाहतूक शाखा-8 असे एकुण 73 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान 1141 वाहनांची तपासणी करुन मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 27 केसेस करण्यात आलेल्या आहेत व 11 हजार 900 रुपये किमतीचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत योगेंद्र ऊर्फ दादू मराठे रा. मोठा मारुती मंदीराच्या मागे, नंदुरबार हा त्याचे कब्जात बेकायदेशीरपणे लोखंडी तलवार कब्जात बाळगतांना बाळगून मिळून आला म्हणून त्याच्याविरुद् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4 चे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील मोलगी नाका येथे भुपेंद्रभाई जुगऱ्या वळवी रा. रानाशी ता. कुकरमुंडा जि. तापी गुजरात राज्य याच्या ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याचेविरुद् अक्कलकुवा पोलीस पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असून लवकरच त्यांचेवर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.








