नंदुरबार l प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी” द दारूचा नव्हे, द दुधाचा ” म्हणत, व्यसनविरोधी संकल्प घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा चला व्यसनाला बदनाम करूया या अभियान अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत घेण्यात आला.
या कार्यक्रमास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष हैदर अली नूरानी,डॉ. विवेक पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, प्रधान सचिव श्रीकांत बाविस्कर, प्रदीप केदारे, निवासी शाळेचे मुख्याध्यापक एस. के.केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर डॉ. विवेक पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय?व्यसनाचे प्रकार कोणकोणते? व्यसन का लागते? व्यसनाचे शरीरावर कोणकोणते दुष्परिणाम होतात? व्यसन मानसिक आजार कसा? व्यसनामुळे होणारे विविध आजार कोणते?याची तपशिलात माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.
शाळेचे मुख्याध्यापक एस के केदारे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील पालकांचे व्यसन सोडण्याबद्दल प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष हैदर अली नुरानी यांनी गुटख्याचे दुष्परिणाम सांगत विद्यार्थ्यांना त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी व्यसनमुक्तीपर गीत सादरीकरण करून व्यसनाचे दुष्परिणाम विशद केले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. स्वतः व्यसन करणार नाही आणि, व्यसनाला मदत करणार नाही, प्रोत्साहन देणार नाही, व्यसनमुक्त समाजासाठी कृतीशील राहील अशी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी विजय बोडरे, घनश्याम सोनवणे, संदीप निकुंबे,शिक्षकेतर कर्मचारी सुशील बैसाणे,अर्जुन तडवी,चंपालाल पटले,विजेंद्र पटले, प्रदीप जगदाळे,चंद्रकांत शिरसाठ, वरुण पवार आदींनी परिश्रम घेतले.








