नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा- बायपास रस्त्यावर दोन दुचाकींची धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एकाविरुद्ध तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील बुधावली येथे राहणाऱ्या प्रताप देवलू वळवी हे दुचाकीने जात असताना अज्ञात दुचाकी स्वाराणे रस्त्याचा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून प्रताप देवलू वळवी (वय 59) यांच्या दुचाकीला धडक दिली.
याअपघातात प्रताप देवलू वळवी यांचा मृत्यू झाला.तसेच त्यांच्या मृत्यू स कारणीभूत होऊन दुचाकीचे नुकसान करून घटनेची खबर न देता पळून गेला म्हणून विनेश प्रताप वळवी रा.बुधावली ता.तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध भादवी कलम 304 (अ), 279,337,338,427 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 134/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई धर्मेंद्र पवार करीत आहेत.








