नंदुरबार l प्रतिनिधी
विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते तळोदा पोलीस ठाण्यात एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमाचे उद्घाटन आले.
संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना शोधून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एक कॅमेरा पोलीसांसाठी हा उपक्रम सुरु करण्याची संकल्पना नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी मांडली होती. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकानदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांची बैठक घेवून त्यांना या उपक्रमाचे महत्व सांगून त्यांनी लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन द्यावा असे आवाहन केले होते.
जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांपैकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिला. तळोदा शहरात 15 व्यापारी, दुकानदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी प्रत्येकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत.
एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले CCTV कॅमेऱ्याचे मुख्य नियंत्रण कक्ष तळोदा पोलीस ठाणे येथे असून त्याचे उद्घाटन परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचेसह अक्कलकुवा उप विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, तळोदा शहरातील ग्रामस्त व इतर मान्यवर उपस्थित होते.








