नंदुरबार l प्रतिनिधी
असलोद (ता. शहादा) येथील दिनेश पाटील, वेडू पाटील यांच्यासह तीन जणांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात व गावातील अतिक्रमण काढताना झालेल्या अन्यायाविरोधात शहादा पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केलेले होते.
शनिवारी (ता. ३०) सरपंच व ग्रामसेवकांनी लेखी आश्वासन दिल्याने शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मकरंद पाटील व मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
सरपंच व ग्रामसेवकांनी दिलेले लेखी आश्वासनाचे पत्रदेखील उपोषणकर्त्यांना मकरंद पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुनील गायकवाड, किरण मोरे, जनार्थाचे विक्रम कान्हेरे यांच्यासह असलोद येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.








