नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या २-३ दिवसांपूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राजापूरचे सरपंच रवींद्र गावित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच चौथ्या दिवशी त्यांची संपूर्ण टीम सेनेत स्वगृही परत येत भाजपला रामराम ठोकला.
नंदुरबार तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र गावित शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते होते.त्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश २ दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. विविध प्रलोभने व भूलथापांना बळी पडत आपण आदिवासी विकास डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता असे सरपंच रवींद्र वळवी यांनी सांगितले.
काल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच रवींद्र गावित यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी पं.स सभापती दीपमाला भील,शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी, गोपीचंद पवार,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,जि.प सदस्य देवमन पवार, पं.स माजी सभापती माया माळसे, माजी जि.प सदस्य अंबू पाडवी, पं.स सदस्य अंजना वसावे,कमलेश महाले,बेगाबाई भिल,संतोष साबळे, बायजाबाई भिल,कलाबाई भिल,शितल परदेशी,छाया पवार,सरपंच अविनाश भील,जयसिंग पवार आदी उपस्थित होते.








