नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच रेखाबाई माळी यांच्या हस्ते १०८ रोपांचे वाटप नागरीकांना करण्यात आले. या रोपांचे स्मशानभुमी परिसरात लागवड करुन संगोपनाची जबाबदारी काकर्दे ग्रामस्थांनी घेतली.
तालुक्यातील काकर्दे ग्रामपंचायत व शिवशक्ती ग्रुप नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व रोप वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काकर्देच्या सरपंच रेखाबाई माळी यांच्या हस्ते बेल झाडाची लागवड करुन वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली.
तसेच शिवशक्ती गृप नंदुरबार यांच्यामार्फत १०८ रोपांचे वाटप करण्यात आले काकर्दे गावातील स्मशानभुमी परिसरात ग्रामस्थ व पदाधिकार्यांनी वृक्ष लागवड केली. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी काकर्देच्या ग्रामस्थांनी घेतली.
याप्रसंगी उपसरपंच किरण मराठे, ग्रामसेवक एस.डी.गायकवाड, कृषी सहाय्यक बोरसे, ग्रा.पं. सदस्य कलाबाई भिल, वैशालीबाई महाजन, विमलबाई महाजन, हिराबाई माळी, सुरेखाबाई पाडवी, पुंडलिक मराठे, कांतीलाल ठाकरे, मनसेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, दत्तात्रय खलाणे, देविदास खलाणे, धनराज माळी, विठोबा माळी, संदिप माळी, भटु माळी, नारायण माळी, राहुल बागुल, नथ्थु ठाकरे, नारायण मराठे, दिनेश मराठे .गणेश खलाणे, सुनिल पवार, चेतन शिंदे, तुषार मिस्त्री व महिला बचत गट, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.








