नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्र व चौपाळे रोड येथील कृषी व संशोधन प्रकल्प येथे श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहचा आज सत्यदत्त पूजन करून सांगता करण्यात आली.
या सप्ताह कालावधीत श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन ,माळ जप ,विना वादन या सेवा २४ तास अखंड ८ दिवसा पर्यंत सुरू होत्या. २०-१२-२३ ते २७-१२-२३ या सप्ताह काळात खालील प्रमाणे सेवा रुजु करण्यात आली . श्री गुरुचरीत्र पारायण ३६५ श्री स्वामी चरीत्र पारायण – १८६६, श्री दुर्गासप्तशती पारायण -९९२, रूद्र पारायण-६८९ ,श्री मल्हारी सप्तशती पारायण- ३२५,श्री स्वामी समर्थ मंत्र जप -७९,९०,२७२ श्री नवार्णव मंत्र जप-७.२२,१९६ , श्री गायत्री मंत्र जप ७,५९,२४०,श्री महामृत्युंजय मंत्र जप २,२९ ९३२, एवढी सेवा श्री स्वामी समर्थ व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी अर्पण करण्यात आली .या सप्ताहामध्ये १८ ग्राम अभियानातील विविध स्टॉल लावण्यात आले होते ग्राम अभियाना माहिती या सप्ताह कालावधीत सेवेकरी ना देण्यात आली.अनेक देव देवतांचे हवनात्मक सेवा केंद्रात सप्ताह कालावधीत करण्यात आली.

काल २७/१२/२३ ला सत्यदत्त पूजन, महाआरती, महाप्रसाद वाटप करून सप्ताहाची सांगता करण्यात आली. तसेच ७ जानेवारी २०२४ रोजी बालसंस्कार व शिशुसंस्कार या विभागामार्फत नंदुरबार येथील कृषी व संशोधन प्रकल्प चौपाळे रोड येथे मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात विद्यार्थ्यांनी व लहान बालकांनी सहभागी व्हावे तसेच २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कृषी महोत्सवादेखील शेतकरी व सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व कृषी संशोधन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे.









