नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बापूजी नगरात रहिवाशांच्या सोयीसाठी रस्त्यांची कामे करण्यात येतील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहारा टाऊन परिसरातील बापूजी नगरात खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,शहाद्याचे जहीर शेख, पत्रकार हिरालाल चौधरी,शिवसेना महानगर प्रमुख विजय माळी, उद्योजक नितेश अग्रवाल,प्रेम सोनार,योगेश चौधरी,जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत,किरण चौधरी, मुकेश मोची,रवींद्र पवार, मुकेश सूर्यवंशी, मिलिंद जाधव, कैलास मोरे, विकास भदाणे,शैलेंद्र चौधरी, स्वप्निल सोनार, मधुकर वाघ,पितांबर पवार, हरीश पवार, गणेश राजपूत, पुंडलिक पवार, रवींद्र चौधरी, कृष्णा पवार, खंडू धनगर,जयदीप पवार, योगेश पवार, प्रफुल चौधरी,नरेश मोची उपस्थित होते.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शहरातील प्रत्येक प्रभागाच्या विकास करण्यात आलेला आहे.नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी आवश्यक त्या उपायांवर भर देण्यात आली. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी कॉलनीमध्ये व्यायामाचे साहित्य बसवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.