तळोदा l प्रतिनिधी
येथील आदिवासी संस्कृती भवनात भाजपा शहर कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष निलेश माळी होते.
याप्रसंगी आ.राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भरत माळी, विश्वनाथ कलाल, माजी नगरसेक जितेंद्र सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष प्रेम पाडवी, अनुसुचित जाती जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दरबार पाडवी, जिल्हा संयोजक नीलाबेन मेहता, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शानुबाई वळवी, नारायण ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रकाश ठाकरे, प्रा.विलास डामरे, माजी नगरसेक संजय माळी, सुभाष चौधरी, शाम राजपूत, कैलास चौधरी, बळीराम पाडवी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.यात ज्येष्ठ नेते विश्वनाथ कलाल, भगवान मगरे, अरविंद पाडवी, सुरेश माळी, विलास डामरे, दिलीप जोहरी, स्व.नारायण पाटील, स्व.त्रंबक शिंपी, स्व.भगवान चौधरी, स्व.महेंद्र वाणी, रसिलाबेन देसाई, प्रभाकर माळी, समध लष्करी,अन्नपूर्णा शुक्ला, चुडामण मराठे, हिरालाल मगरे, युनूस अन्सारी, कृष्णा पाडवी, ईश्वर पाडवी, अरविंद वसावे यांचा समावेश होता. यावेळी तळोदा शहर मंडळ कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्षपदी गोकुळ पवार, जगदीश परदेशी, राजू गाडे, राजकपूर मगरे, पंकज तांबोळी, दिगंबर सूर्यवंशी, कुणाल कलाल, सरचिटणीस म्हणून निमेशचंद्र माळी, दीपक चौधरी, प्रमोद वाणी, मनीषा गुरव, ईश्वर पाडवी यांची तरच चिटणीसपदी राजेंद्र वाणी, गणेश शिंदे, सचिन उदासी, प्रवीण चौधरी, संदीप बोरसे, असलम पिंजारी, गणेश सुतार, कोषाध्यक्ष सुभाष चौधरी, माजी सैनिक आघाडी उदय सूर्यवंशी व विविध आघाडींसह ८० जणांचा समावेश असणारी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी आ.राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.दरम्यान, भाजपच्या कार्यक्रमात जेष्ठ नेते डॉ.शशिकांत वाणी, माजी शहराध्यक्ष योगेश चौधरी,माजी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्यासह जिल्हा तसेच प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. प्रास्ताविक शहराध्यक्ष गौरव वाणी, सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी तर गोकुळ मिस्तरी यांनी आभार मानले.








