म्हसावद । प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.शुभा फरांदे पाध्ये, प्रदेश समन्वयकशहादा येथे भाजपा बेटी बचाव बेटी पढावतर्फे रांगोळी स्पर्धा मृणालनी बागल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, विधानसभा प्रभारी कैलास चौधरी, जिल्हा अध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाव बेटी पढाव तर्फे घर तिथे रांगोळी स्पर्धा शहादा येथे घेण्यात आली.
जिल्हा समन्वयक निलाबेन मेहता यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रथम बक्षीस राज्यस्तरीय रुपये 21000 व स्थानिक स्तरावर बक्षीस वितरण करण्यात आले सर्वांनी सुबक देशभक्तीपर भाव विभोर करणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या.
बक्षीस वितरण आमदार राजेश पाडवी, प्रदेश समन्वयक मृणालिनी बागल, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, शहादा पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिवाजी बुधवंत,सौ. माधवीताई पाटील, निलाबेन मेहता यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष अनामिका चौधरी व श्री.गुरव यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा प्रभारी कल्पना पंड्या, जिल्हा सह योजक संगीता पाठक, जिल्हा संयोजक अभाव वाणी उपस्थित होते
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष शानू ताई वळवी जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, ॲड.राजेश कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी रोहिणी भावसार वंदना भावसार, विनोद जैन, घनश्याम पाठक, पंकज सोनार, हेमराज पवार, प्रशांत कुलकर्णी, कमलेश जांगिड यांनी परिश्रम घेतले.








