नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी सव्वा दोन कोटी राम नामाचे लिखाण केले पेपर तसेच पुस्तिका अयोध्या येथिल हनुमानाच्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती भरत लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार शहरातील लोहार समाज गणेश मंडळांने भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवसी म्हणजे श्री गणेश चतुर्थीला लोहार समाजाने नंदुरबार जिल्ह्यातील हिन्दू बांधवांना आवाहन केले की, अयोध्या येथे २२ जानेवारी महिन्यात प्रभु रामचंद्रचा मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते आहे.
त्याअनुषंगाने भगवान श्रीरामचा नामाचा कागदावर लिखाण करुन जप करावा. राम राम नामाचा जप लिखाण केले पेपर असे सव्वा दोन कोटीचा जप पुर्ण केला आहे. राम राम नामाचा जप लिखाण केले पेपर २३ डिसेंबर रोजी भरत लोहार त्यांचे समाज बांधव अयोध्या येत शनिवारी निघणार आहेत.
मोबाईल खेळण्या पेक्षा राम नामाचा जप करावा राम राम नामाचा लिखाण करावे. आपल्याला मानसिक समाधान लाभते , मन स्थिर होते.
भरत लोहार