नंदुरबार l प्रतिनिधी
सुझलॉन व सर्जन रियालिटीज यांच्या वेळकाढू धोरणाविरुद्ध आदिवासी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकयांच्या जमीनीवर सुझलॉन व तिची उपकंपनी रियालिटीज सर्जन यांनी बेकायदेशीर पोल , रस्ते टाकून जमीनीच नासधूस केली आहे . आदिवासी शेतकऱ्यांना जीवन जगण्यापासून मागील वीस वर्षापासून वंचित ठेवले आहे . मूळात आदिवासींच्या जमीनी या ३६ व ३६२ च्या कायद्यानुसार खरेदी – विक्री तसेच गहाणखत , लिज नोटरी , करारनामे होत नाहीत . तरीही वरील कंपनीने बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत आदिवासी शेतकरी व महसूल प्रशासनाची परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस दस्त बनवून घेतले आहेत .
याबाबतीत समिती व शेतकरी मागील तीन वर्षांपासून जनआंदोलन करीत आहे . आपण याबाबतीत वेळोवेळी बैठका घेवून कंपनीला आदिवासीचे केलेले दस्त प्रमाणित करून देण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत . दि .०८ नोव्हेंबर २०२३ रोजी आपण बैठक घेवून तसे आदेश दिले . त्यावर बैठकीत उपस्थित असलेल्या कंपनी प्रतिनिधीनी १५ दिवसात दस्ताऐवज सत्य प्रतिज्ञापत्राद्वारे करून देण्याचे मान्य केले . परंतू प्रत्यक्षात आजपर्यंत ते दस्तऐवज प्रमाणित करण्यात आलेले नाही. त्यामुळे कंपनी व त्यांचे व्यवस्थापन हे आदिवासी शेतकन्यांच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध म्हणून दि .१२ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन केले होते .
त्यादिवशी कंपनीचे जनार्दन कृष्ण जमदाळे यांनी जिल्हाधिकारी व समिती यांना लेखी पत्र देत आठ दिवसात प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले होते . परंतू दहा दिवसाचा कालावधीत होवून कंपनीने
आश्वासन पाळलेले नाही . व आदिवासी व प्रशासनाची फसवणूक केलेली आहे .
त्यामुळे कंपनी व त्याचे व्यवस्थापक हे आदिवासी शेतकऱ्याशी खोळसाडपणे वागत आहेत .कंपनीने या आदिवासी शेतकऱ्यांना अनेक वर्षे जमिन वापरल्याचा करार नामे द्यावा अशी मागणी केली आहे . अन्यथा त्यांचे पोल व रस्ते बंद करावेत , अशीही मागणी केली आहे . त्यावर कंपनीने त्यांची भूमिका आजही स्पष्ट केलेली नाही . म्हणून सर्व शेतकरी आजही न्यायापासून वंचित आहोत म्हणून आज सर्व १७५ आदिवासी शेतकऱ्यांनी कंपनी व महसुल प्रशासनाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याच्या प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने आत्मदहनाचा प्रयत्न हानुन पाडण्यात आला .
यानंतर उपजिल्हाधिकारी गो.पा. दाणेज यांच्या उपस्थितीत शेतकरी व सुजलोनच्या अधिकारीची बैठक घेण्यात आली .यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे,सचिव भीमसिंग पाडवी,भिला भिल,परबत पाडवी ,संजय भिल,दामू भिल ,तानु भिल,हिरामण भिल ,बापू भिल,मोहन भिल,रतीलाल भिल,गंगाराम भिल ,साहेबराव भिल,बायजाबाई भिल,तानकाबाई भिल आदी उपस्थित होते








