नंदुरबार l प्रतिनिधी
146 खासदारांना निलंबित करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षेच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली परंतु केंद्र सरकारने या खासदारांना बेकायदेशीर हुकूमशाही पद्धतीने निलंबित केले. या विरोधात इंडिया आघाडीने आज देशव्यापी आंदोलन केले. त्यानुसार केंद्र सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आला .
ज्या भाजपच्या खासदारांनी चार मुलांना संसदेत जाण्यासाठी पास दिली त्याबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्र्यांशी संरक्षणाच्या बाबतीत चर्चा घडवून आणावी ही मागणी केली. परंतु केंद्र सरकारने विरोधी पक्षाचे 146 खासदारांना निलंबित केले आहे त्यामुळे देशभर केंद्र सरकारच्या निषेध करून लोकशाही वाचवा ही मागणी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज नंदुरबार येथे तहसील कार्यालयाच्या बाहेर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले व जाहीर निषेध करण्यात आला.
यासंदर्भात तहसीलदार नितीन गजरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नथ्थु साळवे ,रामसिंग मोरे, जबाबाई कोळी, सनुबाई न्ह्याये, वनाशीबाई भिल, शेख जुबेर आदी उपस्थित होते.








