नंदुरबार l प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप संपन्न झाले.
शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व जिल्हा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.आज रोजी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अमोल बागुल यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने विज्ञान तंत्रज्ञान पारंपारिक रूढी,विज्ञान युग,विज्ञानाचे फायदे व तोटे तसेच गणित तज्ञ रामानुजन यांच्या जीवनपट यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले परीक्षणासाठी नंदुरबार तालुका व्यक्तिरिक्त परीक्षकांचे नेमणूक करण्यात आले होते.परीक्षणात प्राथमिक व माध्यमिक गटात प्रथम तीन व उत्तेजनार्थ उर्वरित गटात प्रत्येक एक असे निवड करण्यात आली.प्राथमिक गटात प्रथम.कु.समिधा नितीन देवरे.द्वितीय.नचिकेत विवेक अर्थेकर.तृतीय.अर्णव गौरीशंकर धुमाळ.उत्तेजनार्थ.चेतना संतोष मराठे.
राखीव गटात.आर्यन धनराज गावित.माध्यमिक गटात प्रथम.कु.भावेश दिनेश शेवाळे.द्वितीय.खानदानीयल नदीम.तृतीय.शेख रेहान शेख इरफान.उत्तेजनार्थ.हर्षदा अशोक माळी.माध्यमिक राखीव गटात.दिव्या नितीन नाईक.माध्यमिक शिक्षक गटात.सौ.विद्या कुंदन सोनवणे. प्राथमिक शिक्षक गटात.योगेंद्र कैलासगीर बाबा. प्रयोगशाळा परिचर/सहाय्यक गटात.धर्मराज गिरधर करणकाळ.
लोकसंख्या शिक्षण गटात.भरत मोहन चव्हाण.तसेच सर्व शाळा यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.संयोजक शाळेचे मुख्याध्यापक निंबा माळी यांनी आयोजन व नियोजन या संदर्भात माहिती दिली.सर्व परीक्षकांचा सन्मान करण्यात आला निवड झालेल्या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनोहर साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.विजय माळी व सोनल महाले यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी मुकेश पाटील.जिल्हा अध्यक्ष, पुष्पेन्द्र रघुवंशी.सचिव,कुंदन पाटील.कार्याध्यक्ष,कपुरचंद मराठे.तालुकाध्यक्ष,फयाज खान.तालुका सचिव,देवेंद्र माळी.यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्व शिक्षक व शिककेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.