नंदुरबार l प्रतिनिधी
काल रात्री 9.15 वाजेपासून भारतातील लाखो वापरकर्त्यांसाठी फेसबुक, व्हॉटसअप व इंस्टाग्राम बंद झाले होते . हे तीनही लोड करण्यात अयशस्वी होत होते. भारतासह विविध देशांमध्ये ही समस्या जाणवत होते .
व्हॉट्सअॅप , इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्याने गोंधळ उडाला असून व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत आहेत .अखेर आज पहाटे सकाळी 5.20 वाजेच्या सुमारास हे ॲप सुरू झाले.
काल दि.4 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.15 वाजेपासून भारतातील लाखो वापरकर्त्यांसाठी फेसबुक, व्हॉटसअप व इंस्टाग्राम बंद झाले होते . हे तीनही लोड करण्यात अयशस्वी होत होते. भारतासह विविध देशांमध्ये ही समस्या जाणवत होती.याबाबत फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे . “ माफ करा , काहीतरी चुकीचं झालं आहे . आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत . लवकरच सर्व काही सुरळीत होईल ” , असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे .याबाबत Whatsapp च्या अधिकृत Twitter अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे त्या त्यांनी सांगितले आहे कि आम्हाला माहिती आहे की काही लोकांना सध्या व्हॉट्सअॅपमध्ये समस्या येत आहेत . आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर येथे अपडेट पाठवू . व्हॉटसअप चे सर्व्हर बंद पडले आहे . सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत . मेसेजिंग , व्हिडीओ कॉल , ग्रूप चॅट , ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली होती .
हा प्रकार साधारणपणे आठ तासांपासून जाणवत आहे . फेसबुक , व्हॉटसअॅप वापरताना सतत एरर येत होता . यावेळी msg जात नव्हते व काहीही डाऊनलोड होत न्हवते.या आधीही 20 मार्चला जगभरात फेसबुक , व्हॉटसअॅप आणि इन्स्टाग्राम ४२ मिनिटांसाठी डाऊन झालं होतं . युजर्सना ही ॲप वापरता आली नव्हतीत . फेसबुकच्या मेसेंजर सर्विसमध्येही एरर येत होते . एकाच वेळी तीनही ॲप डाऊन Down हे तीनही Apps Dow झाले आहेत या लोकप्रिय तिन्ही सोशल मीडियाची मालकी फेसबुककडे आहे.मेसेज पाठवणे किंवा फोटो शेअर करणे आणि सोशल नेटवर्किंगच्या बाबतीत जागतिक बाजारपेठेत पूर्णपाने याच ३ ॲप्स चे वर्चस्व आहे . भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक , व्हॉट्सअॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत . इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत . या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे .
अखेर आज दि. 5 ऑक्टोंबर रोजी पहाटे सकाळी 5.20 वाजेच्या सुमारास हे तिन्ही ॲप सुरू झाले.