नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या रेल्वे गेट जवळील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाला.
नंदुरबार येथील खंडेराव महाराज मंदिरात आज सकाळी १० वा. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात बिरजू म्हस्के यांना पूजेचा मान देण्यात आला. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर तळी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भंडाराची उधळण करण्यात आली. महाप्रसाद वाटप करण्यात आले. रविवारी रात्री वाघ्या मुरली चा कार्यक्रम घेण्यात आला.
महाप्रसाद साठी वांग्याचे भरीत साडेचार क्विंटल, मसाले भात साठी चार क्विंटल तांदूळ, चार क्विंटलच्या भाकरी, दोन क्विंटल ची लापसी बनविण्यात आली होती यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत गुळमकर,रवींद्र चौधरी, भास्कर शिंदे ,ज्ञानेश्वर बंडगर, महादेव बंडगर, अरुण कुंभार ,दगा धोबी,बिरजू म्हस्के, जय शिंदे, अर्जुन हटकर, शेखर कोतवाल यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले.








