नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे शासनाच्या विरोधात उबाठा शिवसेनेचे आदिवासींचे पारंपारिक तुरवाद्य वाजवून आंदोलन करण्यात आले.
आदिवासी साठी स्वतंत्र बजेट कायदा करावा,धनगर जात किंवा कोणतेही जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये ,आदिवासी नसताना धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करावी. महर्षी वाल्मिक महामंडळाची स्थापना मुख्यमंत्र्यांनी कोळी जातीसाठी केलेली आहे ती बरखास्त करण्यात यावी,
अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे परंतु आज 8 दिवस उलटून देखील शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने शासनाच्या निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन स्थळी आदिवासींच्या मयतीमध्ये वाजवले जाणारे पारंपारिक तुरर्वाद्य वाजवून शासनाच्या निषेध करण्यात आला .
शासन कोणत्याच प्रकारे आमच्या मागणीची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे अजून येत्या 8 दिवसात जर शासनाने आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही तर यापुढे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येऊन बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्याच्या ईशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित यांनी सांगितले .यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते








