नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील बिनशेती सर्व्हे नंबर 284/2 मधील भुखंड क्रमांक 1 च्या नोंदीत नव्या फेरफार ऐवजी जुन्याच फेरफारच्या नोंदी आढळून येत आहे. यामुळे नंदुरबार तहसिलदार व तलाठी यांच्याकडून मनमानी कारभार करीत असून संबंधित अधिकार्यांवर नियमानुसार तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी मोहन छोटालाल श्रॉफ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.18 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून नंदुरबार येथील मोहन छोटालाल श्रॉफ हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषणाला बसले आहेत. नंदुरबार येथील बिनशेती सव्र्व्हे नंबर 284/2 मधील भुखंड क्रमांक 1 हा मोहन छोटालाल श्रॉफ व अनिल माधवराव पाटील यांनी सामाईकरित्या नोंदणीकृत दस्तक्रमांक 2059/2005 दि.2 जून 2005 अन्वये खरेदी केला आहे. परंतु तलाठी नंदुरबार यांनी दुसर्याच फेरफार नोंदीचा आधार घेऊन सातबाराचे कब्जेदार मोहन छोटालाल श्रॉफ व राजेश रुपचंद पाटील यांची नावे टाकली होती, ती दुरुस्त होणेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जाची चौकशी होऊन जिल्हाधिकारींकडील आदेश क्रमांक 2023/ जमीन/कलम 155/कावि/268/2023 दि.25 ऑगस्ट 2023 अन्वये सातबाराचे कब्जेदार सदरील तलाठी यांनी नव्याने फेरफार नोंद घेऊन सातबाराचे कब्जेदार सदरील योग्य ती दुरुस्ती करुन दुरुस्त संगणीकृत सातबारा देखील मला मिळाला.
परंतु डिजिटल ऑनलाईन सातबारा काढला असता त्यात तलाठी यांनी पूर्वी जी चुक केली होती, तीच चुक नव्याने करुन चुकीचा सातबारा निघाला आहे. ह्या फेरफार नोंदीने आपल्याकडील आदेशान्वये सातबाराचे कब्जेदार सदरील खरेदीदारांचे नावाची नोंद घेण्यात आली होती, ती नोंद कायम ठेवुन जुन्या नोंदीप्रमाणे पुन्हा चुकीची नावे तलाठी यांनी स्वतःच्या अधिकारात दुरुस्ती केली आहे,
अशी दुरुस्ती करण्यात तलाठीसह इतर संबंधितांचा हात असून पैशांचा देवाण-घेवाणीचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मोहन छोटालाल श्रॉफ यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.








