म्हसावद । प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे आयुष्यमान कार्ड वाटप कार्यक्रम नंदुरबार जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच संजय दशरथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य चेतना भरत पाटील, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ संगीता पाठक, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष ज्योती पाटील व डॉ. सौ रेखा नाईक उपस्थित होते.
यावेळेस प्रा.मकरंद पाटील म्हणाले की आयुष्यमान कार्ड हे प्रत्येकाच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे ज्यावेळेस माणसाला डॉक्टर इलाज करण्याची वेळ येते त्यावेळेस समजते प्रत्येकाने हे कार्ड काढून घ्यावे असे ते म्हणाले सरकारच्या अनेक योजना आहेत त्या पक्षामार्फत अंतिम माणसापर्यंत पोचविण्याचे काम पक्ष करीत आहे.
साधारणता 99 लोकांना करण्याचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन डॉ. भोजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
तसेच जिल्हा सदस्य घनश्याम पाठक यांनी प्रस्तावना करून प्रसंगी सैनिक आगाडीचे दिलीप पवार, शहादा तालुका अध्यक्ष शांतीलाल पाटील किसान मोर्चा तालुका अध्यक्ष बापू सोनार,तालुका उपाध्यक्ष संतोष बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य नंदू भाई, सरदार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय देविदास पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील, अनुप थोरात, बेटी बचाव ची ज्योती पाथरवट, शाहिस्ता शेख, मनीषा पाटील तसेच जगन्नाथ पाटील, सुधीर डॉक्टर ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाष पाटील, देविदास पाटील, धोंडू सुदाम पाटील उपस्थित होते
याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी दीपक मोहिते प्रमोद पाटील,रमेश पवार, महेश चौधरी, रोहन ठाकरे, यांनी विशेष सहकार्य केले








