नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता.जि.नंदुरबार शाळेत क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा.
क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी .एस. पाटील यांनी केले. उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू तयार होऊ शकतात कारण हे कौशल्य ग्रामीण भागातल्या खेळांमध्ये आता निर्माण होत आहे.
भारतात अनेक खेळाडू ग्रामीण भागातूनच निर्माण झालेले आहेत .आपणही त्यांची प्रेरणा घेऊन उत्कृष्ट खेळाडू व्हावं अशा पद्धतीचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा सप्ताह निमित्त लिंबू चमचा, गोणपाट शर्यत, तीन पाय शर्यत ,100 मीटर धावणे, 4×100 रिले शर्यत, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात इयत्ता 5 वी ते 7 वी लहान गट ,इयत्ता 8 वी ते 10वी मोठा गट करण्यात आला होता. स्पर्धेतील विजय खेळाडूंचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक डी .एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले. तर आभार संजय बोरसे यांनी मानले खेळाचे पंच म्हणून उपशिक्षक दीपक वळवी रामानंद बागले यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे उपशिक्षक हारून खा शिकलीगर, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा ,शिपाई संजय वसावे, दिनेश पवार यादींनी परिश्रम घेतले शाळेत राबविण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.








