नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील एक दिवसासाठी हजेरी लावणार आहे. गौतमी पाटीलला अधिकृत निमंत्रित करण्यात आले आहे. 22 डिसेंबरला चेतक फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमात गौतमी पाटील नृत्य सादर करणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव परिचित झाले आहे. गौतमी पाटील या नृत्यांगणेने महाराष्ट्रातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. गौतमी पाटील ज्या कार्यक्रमाला असते तिथे तरुणाईची तूफान गर्दी होत असते. हीच गौतमी २२ डिसेंबर पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे सारंगखेडा येठील चेतक फेस्टिव्हल महोत्सवात प्रेक्षकांसमोर थिरकणार आहे.
सारंगखेडा येथील एकमुखी दत्त जयंती निमित्याने होणाऱ्या प्रसिद्ध यात्रोत्सवाला जोडून असलेला चेतक फेस्टिव्हल होत आहे. २१ डिसेंबर ते ९ जानेवारी पर्यत होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रम होणार आहे. त्यात दुसऱ्याच दिवशी २२ डिसेंबर रोजी नृत्यांगणा गौतमी पाटील हजेरी लावणार आहे.
चेतक फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमात गौतमी पाटील नृत्य सादर करणार आहे. गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेक जण जीव ओवाळून टाकतात, त्यामुळे या कार्यक्रमाला तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमामुळे पोलिस प्रशासनाला वाहतूक व्यवस्थेसह होणारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. तर आयोजकांना वाहन पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने खास व्यवस्था करावी लागणार आहे.








