तळोदा l प्रतिनिधी
वडाळी ता.शहादा येथील रहिवासी व तळोदा येथे काम करणाऱ्या रविंद्र कृष्णा चव्हाण वय २७ याने हातोडा येथील तापी नदीच्या पुलावरून दि.११ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास पाण्यात उडी घेऊन जिवन संपविल्याचे फोन करून सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान हतोडा पुलावर घटनास्थळी अज्ञात मोटरसायकल (क्र. एम.एच.39 ए.जी. 6129) उभी आढळुन आली असून, गुजरात राज्यातील निझर हद्दीत जुना हातोडा गावाच्या परिसरात तापी नदीच्या पुलावरून अज्ञात कारणास्तव तापी नदीच्या खोल पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. तीन दिवस शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह दि.14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वा.पाण्यात आढळुन आला. दरम्यान निझर येथील रुग्णालयात शव विच्छेदन करून मृतदेह हातात दिला. याबाबत निझर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.काँ.योगेशभाई भगतसिंग हे करीत आहेत.
रविंद्र चव्हाण हा होतकरू व मेहनती मुलगा असून त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तो एका बियाण्याच्या कंपनीत तळोदा येथे कामाला असून, मोरवड येथे आत्याला शेतीकामामध्ये मदत करत होता. घरातील परिस्थिती हलाखीची असल्याने वडाळी परीसरात व नातेवाईकांमध्ये हळहळ निर्माण होत आहे.








