Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांवर २ लाख ८२ हजार ३८७ मतदार बजावणार आज मतदानाचा हक्क

Mahesh Patil by Mahesh Patil
October 5, 2021
in राजकीय
0
जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांवर २ लाख ८२ हजार ३८७ मतदार बजावणार आज मतदानाचा हक्क

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समितीच्या गणांसाठी उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज असून प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी आज साहित्यासह रवाना करण्यात आले. दरम्यान या मतदानासाठी जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

उच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षण निर्णयानंतर नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या १3 गणांसाठी उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात प्रशासनातर्फे ४५६ मतदान केंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. यात अक्कलकुवा ३४, शहादा १८६, नंदुरबार २३६ यांचा समावेश आहे. यावेळी अक्कलकुवा तालुक्यात स्त्री मतदार १२ हजार ७०८ तर पुरूष १२ हजार ६२३ एकूण २५ हजार ३३१, शहादा तालुक्यात स्त्री ५७ हजार ३३९ तर पुरूष ५९ हजार ८६८ असे एकूण १ लाख १७ हजार ४०७ तर नंदुरबार तालुक्यात स्त्री ६९ हजार ३०१ तर पुरूष ७० हजार ३३८ एकूण १ लाख ३९ हजार ६४९ असे एकूण जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ३८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले असून आज नंदुरबार शहरातील वखार महामंडळात कर्मचार्‍यांना मतदानासाठी लागणार्‍या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मिनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. या निवडणुक प्रक्रियेसाठी २ हजार ७४२ कर्मचार्‍यांची नियुक्ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. कर्मचारी साहित्य घेवून विविध वाहनातून मतदान केंद्राकडे दुपारी रवाना झाले.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीचे 13 गणांसाठी पोटनिवडणुकीसाठी काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत मोठया प्रमाणावर चुरस निर्माण झालेली दिसून आली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी लाखाच्यावर विद्यार्थी उपस्थित

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी लाखाच्यावर विद्यार्थी उपस्थित

नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी लाखाच्यावर विद्यार्थी उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान : गोमाई नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

September 24, 2023
पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता , गट विकास अधिकारी यांच्या हस्ते गौरव

September 24, 2023
औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

औरंगाबाद खंडपीठाचे पत्नी व मुलांना वाढीव पोटगी देण्याचे आदेश

September 24, 2023
सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विधी महाविद्यालयातर्फे सत्कार

September 24, 2023
राम रहीम उत्सव समिती तर्फे गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उद्या सत्कार

विविध रस्त्यांचे कामे त्वरित सुरू करा, मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मागणी

September 24, 2023
नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी : डॉ. विजयकुमार गावित

September 24, 2023

Total Views

  • 3,588,290 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group