नंदुरबार l प्रतिनिधी
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉय युनियन अंतर्गत महाराष्ट्र गोवा सर्कलच्या ग्रामीण डाक सेवकांनी नंदुरबारात संप पुकारला आहे.केंद्र शासनाने मागण्या पूर्ण न झाल्यास अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
नंदुरबार शहरातील दीनदयाल चौकातील मुख्य टपाल कचेरी समोर ग्रामीण डाक सेवकांनी निदर्शने करीत संप पुकारला आहे.जीडीएस अर्थात ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागण्यासाठी बेमुदत संपर्क पुकारला आहे.ग्रामीण डाक सेवकांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आठ तास काम देऊन सर्व शाखा कार्यालयांचे विभागीयकरण करावे, विभागीय कर्मचाऱ्यांवर प्रमाणे पेन्शनसह सर्व लाभ द्यावे, कमलेशचंद्र समितीच्या अहवालातील सर्व शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जानेवारी 2016 पासून सेवा जेष्ठतेवर आधारित योग्यय निर्णय घ्यावा, ग्रॅज्युटी सूत्रानुसार जीडीएस ग्रॅज्युटी वाढवावी, कमाल मर्यादा आठ लाखापर्यंत वाढवावी तसेच 180 दिवसांची सशुल्क रजा मंजूर करावी 12,, 24 ,36 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामीण डाक सेवकांना कालबद्ध आर्थिक वाढ मंजूर करावी, जीडीएस आणि त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधांची तरतूद करण्यात यावी, एचडीबीएस मध्ये विभागीय कर्मचाऱ्यांचे योगदान वाढवा किमान पेन्शन सुनिश्चित करा सर्व सेवानिवृत्त जीडीएस कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या जीडीएस द्वारे केलेल्या सर्व कामांसाठी इन्स्टिट्यूइन्सेटिव्ह प्रणालीली बंद करून वर्क लोड मध्ये समाविष्ट करा जीडीएस आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमध्ये एकजीडीएस आणि विभागीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीमध्येे एक समांतर असून निश्चित करा एक जानेवारी 2016 पासून सर्व नवीन भरती झालेल्या ग्रामीण डाकक सेवकांना निर्धारण मंजूर करा सदस्यत्वाची त्वरित पडताळणी आणि जीडीएस इंडियनजीडीएस इंडियन सर्व ट्रेड युनियन सुविधा मंजूर करा अविश्वसनीय व असंभव टारगेटच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून ग्राम डाक सेवकांचा होणारा छळ थांबवा मोबाईल वापराचा आग्रह आणि सोशल मीडियावर अनुसरण करण्याचे बंधन थांबवावे डा कर्मयोगी प्रशिक्षणासह इतर प्रशिक्षण व्यवसाय मीटिंगसाठी सर्व ग्रामीण डाक सेवकांना प्रवास व इतर भत्ते द्या विद्यमान आर आय सी टी उपकरणे मागे घ्या आणि सर्व ग्रामीण डाक सेवकांना लॅपटॉप प्रिंटर प्रदान करा दीर्घ दीर्घ अल्पकालीन रिक्त पदांवर पर्यायी व्यवस्था साठी परवानगी द्यावी पर्यायी व्यक्तींचे वेतन वेळेवर करण्यात यावे आदी मागण्याचा समावेश आहे.
आंदोलन स्थळी ग्रामीण डाक सेवक संघटनेचे नंदुरबार धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, सेक्रेटरी संजय पाटील, प्रकाश कुलकर्णी, जगदीश अहिरे, नितीन पाटील, अनिल विसपुते, विजय पाटील, रितेश सोनवणे, भटू गवळी, पितांबर कुंभार, शेखर घाटे आदीसह सर्व ग्रामीण डाक सेवक संघटना युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.