शहादा l प्रतिनिधी
पंचायत समिती शिक्षण विभाग शहादा, माध्यमिक शाळा गोगापूर आणि शहादा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित शहादा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.12 व 13 डिसेंबर रोजी श्रीधारेश्वर विद्या प्रसारक मंडळ गोगापूर संचलीत माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपात जिल्हा स्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेल्या सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य सानेगुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील होते.यावेळी शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे, श्रीधारेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीचे कार्यकारी संचालक आर .डी. पाटील, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील,शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,
मुख्याध्यापक व्ही. जी.पाटील,सेवा निवृत्त मुख्याध्यापक जयदेव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष तावडे, एस. एस.अहिरेे, डी. डी. राजपुत, डी. एन. सोनवणे, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, धारेश्वर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष काशिनाथ पाटील,संचालक कैैलास पाटील, सुरेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव जगदीश पाटील, ज्येष्ठ पत्रकार ईश्वर पाटील, शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.नेत्रदीपक कुवर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विज्ञान प्रदर्शनाच्या दोन दिवसात आलेल्या अनुभवांबाबत सहभागी विद्यार्थी, शिक्षक,विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी म्हटले, विज्ञानासोबतच अध्यात्मिक अनुभव भविष्यातील जबाबदार घटक म्हणून विद्यार्थ्यांना प्राप्त होणे आवश्यक आहेत. कुठल्याही शालेय प्रयोगात विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग असावा.शाळेतील लायब्ररी व प्रयोगशाळांचा वापर केला जावा.विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हातात सध्या मोबाईलच जास्त दिसत आहे.परिणामी वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे.विज्ञान प्रदर्शनासोबतच वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली गेली पाहिजे.आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञान गरजेचे आहे, मात्र त्यातील वाईट बाबी टाळाव्यात.विज्ञानासोबत अध्यात्मिक जोड असणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
तत्पूर्वी मार्गदर्शन करतांना गटविकास अधिकारी श्री.घोरपडे यांनी म्हटले की, विज्ञान प्रदर्शन ही स्पर्धा नव्हे. यातून वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये बिंबवला गेला पाहिजे. विज्ञान प्रदर्शन भरणाच्या मागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हाच आहे. पारितोषिक मिळणे गौण भाग आहे. यातून आपल्याला काय ज्ञान मिळते याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.
गोगापूर येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणत दोन दिवस भरविण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पस्तीस शाळेतील तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले.परीक्षक म्हणून उच्च माध्यमिक गटात कै. सौ.जी.एफ पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रदीप साळुंखे, महावीर इंग्लिश मीडियम स्कूलचे माधव करंजे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.चंद्रकांत पाटील, प्राथमिक व माध्यमिक गटात माध्यमिक विद्यालय तिखोराचे प्रवीण पवार, माध्यमिक विद्यालय डामरखेडा सीमा पाटील, माध्यमिक विद्यालय ब्राह्मणपुरी योगिता पाटील यांनी काम केले.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक गटात 187, माध्यमिक गटात 192
प्रयोगशाळा परिचर 3, शिक्षक 2 असे 384 उपकरण मांडण्यात आले होते.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे उपकरण
शहादा तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या प्राथमिक व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्रीमहावीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. प्राथमिक गटात संदीप लोखंडे याने स्मार्ट ट्रांसपोर्शन अँड सॅटॅलाइट तर माध्यमिक गटात मितेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या आँयसीस या उपकरणांचा समावेश आहे.
प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय गोगापूरच्या वैष्णवी संजय बिलावे,जागृती मोहन वाडीले हिच्या आधुनिक रस्ते, तृृतीय क्रमांक एम.जी.एम.व्ही. सुफ्फा ऊर्दु प्राथमिक शाळेतील तैबा मोहसीन शेख हिच्या कार्बन प्युरीकिकेशन फाँर इंडस्ट्री या उपकरणास आदिवासी गटातुन माध्यमिक विद्यालय दामळदा येथील ज्योती नामदेव, प्रियंंका पुरुषोत्तम सोनवणे, जागतीक तापमान वाढीचेे परिणाम व उपाय योजणा, उत्तेजनार्थ व्हालंटरी स्कुल हर्षाली अनिलगिर गोसावी हीचा प्लास्टीक वापर व पाँलिथीनचा पुर्नवापर प्लान या उपकरणास मिळाली आहे. प्राथमिक शिक्षक गटात माध्यमिक विद्यालय तिखोरा येथील विजय हिरालाल पाटील यांचे लाईफ स्टाईल फाँर इनव्हायमेंट, प्रयोग शाळा परिचर गटात माध्यमिक विद्यालय ब्राह्मणपुरी दिलीप संभू साळवे यांच्या रस्त्यावरून जातांना विज निर्मीती.
सरदार पटेल इंग्लिश मीडियम स्कूल म्हसावद रिद्धी अशोक पाटील याचा सोलर सिस्टीम उपकरणास उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्रीमहावीर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नितेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या आँयसीस या उपकरणास, द्वितीय क्रमांक श्रीसती गोदावरी हायस्कूल म्हसावद भावेश रुपेश सूर्यवंशी यांच्या लाईफ शेविंग स्टिक या उपकरणास, तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय बामखेडा येथील तेजस्विनी गिरासे या विद्यार्थिनीच्या इलेक्शन फ्रॉम व्हायब्रेशन या उपकरणास तर आदिवासी राखीव गटातून शिवदास नथू माध्यमिक विद्यालय जावदा तर्फे हवेली येथील जानवी चव्हाण व करिष्मा पाटील या दोघांना
तसेच उत्तेजनार्थ मुक्ताई विद्यालय डोंगरगाव येथील युक्ता राजेंद्र पाटील हिच्या एग्रीकल्चर अँड ऑर्गनाईज फार्मिंग या उपकरणास तसेच सर्वोदय विद्यालय प्रकाशातील मयुरी राजेंद्र भोई हिच्या उपकरणास पारितोषिक देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अध्यापक साहित्य निर्मिती याच्यातून माध्यमिक आश्रम शाळा कोचरा येथील पुष्पा रंजीत वसावे यांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीस तर शासकीय आश्रम शाळा कोचरा येथील कैलास भगवान नांद्रे यांच्या मनोरंजनातून विज्ञान या उपकरणास पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे.