नंदुरबार l प्रतिनिधी-
जिजामाता कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आलेली आहे.
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. सिकलसेल हा आजार रोखण्याचा एक भाग म्हणून जिजामाता कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे.उपाध्यक्ष,डॉ. विक्रांत मोरे, राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सतीश व्ही. देवरे यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जिजामाता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या बॅनरखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या 265 रक्ताचे नमुने घेऊन सिकलसेल आजाराची तपासणी केली.
यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यासाठी डॉ.स्वेता शसी, कविता पवार, सोनी शिंदे, फुनशा गांगुर्डे, वसुंधरा चौरे, ज्ञानेश्वरी राऊत, अंजना आडे, सुषमा पवार, पूर्वा खरे, पायल जाधव, प्रांजल कासार इ.आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ. विलास पंडित, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.सुनिल सूर्यवंशी, त्र्यं.मोहने प्रा.भारत खैरनार यांनी परिश्रम घेतले