नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुप व तळोदा पोलीस ठाण्यातर्फे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला.
आता सर्वत्र ऊस तोडणी ला सुरुवात झाली असून शेतकरी बांधव तसेच कारखानादार ट्रॅक्टरद्वारे ,ट्रॉली बैलगाडी तून ऊस शेतातून कारखान्या पर्यंत नेतात. या वाहनांना कारखान्या पर्यंत पोहोचत असताना बऱ्याच वेळेस रात्र होते.रात्रीच्या वेळेस अंधारात उसाने भरलेले ट्रॅक्टर इतर वाहनांना दिसत नाही व त्यामुळे इतर वाहने अचानक ट्रॅक्टर वर धडकतात व मोठा अपघात होतो.
तसेच सकाळी सकाळी थंडीत धुके असल्याने वाहन दिसत नाही ,बैलगाडी दिसत नाही यावेळेस बऱ्याच वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे समाजात नेहमी समाज हितासाठी सहयोग सोशल ग्रुप व तळोदा पोलीस ठाणे द्वारे अशा सर्व वाहनांना दसवड खांडसरी व श्रीकृष्ण साखर कारखाना येथे जाऊन व रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅक्टरला,ट्रॉली बैलगाडी मागे व पुढे अंधारात लांबून चमकेल चकाकेलं अश्या लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे रेडियम लावण्यात आले. जेणेकरून येणाऱ्या वाहनाला पुढे वाहन जात असल्याचे सहज दिसेल व होणारा अपघात टळेल आणि जीवितहानी होणार नाही. अशी सुविधा देत असताना उपस्थित बऱ्याच वाहन चालकांनी स्वतःहून स्टिकर मागून घेतले व आपल्या वाहनाला लावून घेतले .सहयोग सोशल ग्रुपच्या व तळोदा पोलीस ठाणे च्या या उपक्रमामुळे शेतकरी,ऊसतोड मजूर,ठेकेदार या नावीन्यपूर्ण सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी तळोदा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार,सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍड.अल्पेश जैन ,चेतन शर्मा,कुशल जैन,विनोद माळी,मोईन पिंजारी,प्रमोद जहागीर तर ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष आर.ओ मगरे,सचिव अशोक सूर्यवंशी,राजाराम राणे,अतुल सूर्यवंशी,रमेशकुमार भाट तर तळोदा वाहतूक शाखेचे पोलीस नाईक शशिकांत आहिरे, विजय जावरे, संदीप महाले रवींद्र पाडवी इत्यादी यांनी सहकार्य केले.
ऊसतोड वाहनांनी टॅक्टर,ट्रॉली,बैलगाडी वगैरे यांनी संध्याकाळी ,रात्री सकाळी वातावरणीय बदल थंडी धुके यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सर्वांनी वाहनांना दर्शनी व मागील दर्शनी भागात पिवळा, लाल हिरवे रेडियम लांबून चमकेल असे स्टिकर लावावे ज्यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी सहकार्य करावे,जनजागृती करावी असे आवाहन केले.
ॲड. अल्पेश जैन
सहयोग सोशल ग्रुप अध्यक्ष तळोदा.