Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त; 2 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करणार

team by team
December 3, 2023
in राजकीय
0
महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त; 2 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करणार

नंदुरबार l प्रतिनिधी

सिकलसेल ऍनिमिया हा घातक आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय करता यावे यासाठी आवश्यक असलेले अत्यंत आधुनिक तपासणी यंत्र नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून हे आधुनिक यंत्र प्राप्त झालेला नंदुरबार हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव आदिवासी जिल्हा ठरला आहे. आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित आणि संसदरत्न खा. डॉ. हिना गावित यांनी विशेष प्रयत्न करून ही व्यवस्था नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त करून दिली आहे.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील लॅब मध्ये हे यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. संसदरत्न खा. डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट देऊन या तपासणी यंत्राची पाहणी केली.

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी त्या प्रसंगी सर्व माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश वसावे, नंदुरबार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हुमणे आणि संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. येत्या तीन महिन्यात दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि जिओ टॅगिंग द्वारे त्यांची सर्व माहिती संग्रहित ठेवली जाईल. दर तासाला 45 रुग्णांची तपासणी करण्याची या यंत्राची क्षमता आहे; अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू याच्याबरोबरच सिकलसेल ऍनिमिया या अनुवंशिक आजाराचा देखील अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न आहे. विशेषतः आदिवासींमध्ये हा आजार आढळून येतो. हा एक रक्तदोषाशी संबंधित आजार असून सारख्या रक्तगटातील स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक संबंधातून निर्माण होतो. व्यक्तीमध्ये सामान्यतः लाल रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात.

सिकलसेल झालेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या असतात. नंदुरबार जिल्ह्यात असे रुग्ण हजारोच्या संख्येने असल्याचे मागील पंधरा वर्षात झालेल्या अनेक तपासणीतून निष्पन्न झाले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवून झाले जनजागृती देखील करण्यात आली तेव्हापासून काही अंशी नियंत्रण यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री ना. डॉ.विजयकुमार गावित आणि संसदरत्न खा. डॉ. हिना गावित यांनी प्रयत्न करून सिकलसेल आजाराला नियंत्रित करणाऱ्या उपाययोजनांना चालना दिली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला जवळपास दोन कोटी रुपये खर्चाची प्राप्त झालेली आधुनिक तपासणी यंत्रे त्याचाच एक भाग आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सोमवारपासून नंदुरबारातून काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद पदयात्रेस सुरुवात

Next Post

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

Next Post
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना बारा बलुतेदारांसाठी नवसंजीवनी : संजय गाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add