नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी भागातील विकास कामांना स्थगिती देण्याचे पाप महायुती सरकारचे केला असल्याचा आरोप माजी मंत्री ॲड.के. सी.पाडवी यांनी केला ते सातपुड्याच्या दुर्गम भागातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील दळणवळणासाठी महत्वाचे असलेल्या पालका ,चुलवळ, सिसा ते कालीबेल कालीवेल ते अस्तंबा त्याच्यासोबत सुरवाणी ते जमाना सिसा ते काकरपाटी या रस्त्यांच्या कामांना आमदार.ॲड.के.सी.पाडवी यांनी मंजुरी दिली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर दुर्गम भागातील या महत्वपूर्ण रस्त्यांच्या कामाला आताच्या सरकारने स्थगिती दिली होती.त्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न उभा राहिला होता.
आमदार.ॲड.के.सी.पाडवी यांनी सर्वोच्च न्यायालयातून या रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठवली होती. त्या कामांचे भूमिपूजन सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभा घेण्यात आली. या सभेला शेकडोच्या संख्येने परिसरातील गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने विरोधकांच्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती देण्याच्या पाप केले.
मात्र न्यायालयाने आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना न्याय दिला आहे.आदिवासींच्या विकासाच्या आड येणाऱ्या सरकारला आदिवासी बांधव धडा शिकवतील असा इशारा त्यांनी यावेळेस सरकारला आमदार.ॲड.के.सी.पाडवी यांनी दिला.