नंदुरबार l प्रतिनिधी
स्वस्त धन्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त धन्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे आपल्या मागणी, अडचणी, समस्या यावर वारंवार अनेक निवेदने, प्रत्यक्ष भेटून, आपल्या कार्यालयात देवून आजपावेतो आपल्या कार्यालयाकडून आमच्या महासंघाच्या एकाही पत्राला उत्तर किंवा त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक असून राज्य शासनाच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी करणारे आम्ही घटक आहोत. राज्यात, देशात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मोफत धान्य वितरण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील
परवानाधारक त्रस्त झालेले असून, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
याबाबत सविस्तर निवेदने आपल्या कार्यालयात, विधानसभा सदस्यांनी आपल्यापुढे आमची बाजू मांडलेली असून सुद्धा आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, ही खेदाची बाब आहे. या सर्व बाबींना कंटाळून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने व ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने राज्य व देश पातळीवर संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला असून या आंदोलनाचा पहिला टप्पा दि. । डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधावे म्हणून तसेच मिडिया व लोकप्रतिनिधींना तसेच जनतेला आमच्या प्रश्नांची जाण व्हावी म्हणून व सरकारने तात्काळ दखल घ्यावी,
यासाठी आंदोलन करण्यात येईल. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार नागपूर येथे आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहेत.
तसेच ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशनच्या वतीने राज्यभरातील व देशभरातील स्वस्त धान्य दुकानदार दि. 1 जानेवारी 2024 पासून आपली स्वस्त धान्य दुकानेआपल्या न्याय मागण्यां च्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य व केंद्रीय संघटनेने घेतलेला असून राज्यभरातील रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची राहील,
स्व. धा. दुकान यांचे मागणी प्रलांबित असुन त्या पुर्ण करावे अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले.यावेळी पॉश मशिन 4G SG मशिन मिळावे. स्व. धा. दुकानदारास 30 ते 50 हजार मानधन मिळावे. स्व. धा. दुकानात कोठा 5 तारखेचा आत मिळावे. कमीशन दर महिन्याला मिळावे अशी मागणी करीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जि.अध्यक्ष नेमिचंद जी जैन ,सचिव कुणाल वसईकर , नंदुरबार ता. अध्यक्ष नाना ठाकरे , नंदुरबार शहर अध्यक्ष प्रमोद बोडखे ,
अ.कु.ता.अध्यक्ष मोतीराम वसावे, शहादा ता.अध्यक्ष अरविंद कुवर , तळोदा ता.अध्यक्ष शानुताई वळवी,नवापुर ता.अध्यक्ष भरत पाडवी,धडगाव ता. अध्यक्ष भिमसिंग पावरा यांच्यासह सर्व पदाधिकारी व स्व. धान्य दुकानदार उपस्थित होते.