Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

team by team
November 30, 2023
in आरोग्य
0
डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे डासोत्पत्तीस्थानात वाढ होऊन डेंग्यू व चिकुन गुनिया या आजाराचा प्रसार होत असून नागरीकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यापासून होतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.

उपाय योजना
डेंग्यू व चिकुन गुनिया डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण शहरात व आपल्या गावात निश्चित कमी होईल. यासाठी घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत. पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत. इमारतीच्या छतावर पाणी साचु देऊ नये, परिसरातील टायर, बाटल्या इ. भंगार सामानाची विल्हेवाट लावावी. गुरांची /पक्षांची पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावी. अंगभर कपडे घालावेत. झोपतांना मच्छरदाणीचा, डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.

आजाराची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, डौळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. डेंग्युबाबत लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच खाजगी लॅब धारकांनी डेंग्यू रुग्णांचे नमूने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी इलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी आहे. ही चाचणी जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे मोफत करण्यात येत असल्याचेही श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था राज्य पुरस्कारांचे शानदार समारंभात वितरण

Next Post

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

Next Post
महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add