Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था राज्य पुरस्कारांचे शानदार समारंभात वितरण

team by team
November 30, 2023
in राजकीय
0
आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था राज्य पुरस्कारांचे शानदार समारंभात वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व उर्जादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

 

शहरातील महाकवी कालीदास कलामंदिर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था यांना सन २०१९ ते २०२२ या चार वर्षाच्या राज्य पुरस्कारांचे आज मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते शानदार समारंभात वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

 

 

 

याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, माजी आमदार उत्तम इंगळे, शिवराम झोले, एन. डी. गावित, संजय कुलकर्णी, संतोष ठुबे, सुदर्शन नगरे यांच्यासह पुरस्कारार्थीचे कुटूंबिय, नातेवाईक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलतांना डॉ गावित पुढे म्हणाले की, आदिवासी हा वंचित व अशिक्षित घटक आहेत. या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यापासून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही. आपल्या हातून यापुढेही समाजाची सेवा घडत राहो व पुरस्कार्थीनी यापुढेही जोमाने काम करावे ही अपेक्षा मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही त्यांना येत्या दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्या, वस्त्या, पाडे बारमाही रस्त्याने जोडणार आहेत. आदिवासी बांधवांसाठी वनउपज स्थानिक पातळीवर गोळा करून त्यावर प्रक्रिया करून

 

 

 

उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येणार असून या प्रक्रिया केलेले उत्पादने आदिवासी विकास विभाग खरेदी करण्यासाठी विक्री व्यवस्था उभारली जाणार आहे. आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विभाग योजनाही राबवित आहेत. असेही आदिवाीस विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

प्रास्ताविकात नयना गुंडे यांनी पुरस्काराची पार्श्वभूमी विशद केली. आदिवासी विकास विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी सेवकास २५ हजार तर संस्थेला ५१ हजार रूपयांचा पुरस्कार दिला जातो. कोरोना कालावधीमुळे मागील चार वर्षाचे पुरस्कार एकत्रित देण्यात येत आहेत अशी माहिती आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांनी यावेळी दिली.

 

 

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पुरस्कारार्थीचा परिचय देणा-या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. शशिकांत वाणी, नुरानी कुतुबअली, नामदेव नाडेकर, संतोष जनाठे, मधुकर आचार्य आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

Next Post
डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add