नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जी टी पाटील महाविद्यालय ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेना दिवसाचे अवचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालय प्रांगणात करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.एम. जे.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तदप्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी, उपप्राचार्य एन.जे सोमानी जलकल्याण रक्तपेढीचे प्रमुख लालचंद आणि फर्स्ट ऑफिसर राहुल पाटील व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
रक्तदान हे महान कार्य असते व आजच्या परिस्थितीत भारतात रक्ताचा तुटवडा आहे, ही बाब लक्षात घेता रक्तदान एका व्यक्तीचे जीवन वाचवू शकतो तेआपण समाजभिमुख होऊन केलेच पाहिजे असे प्रतिपादन उद्घाटक प्राचार्य रघुवंशी यांनी केले तर डॉ लालचंद यांनी भविष्यात या पद्धतीच्या मोठ्या स्तरावरचं रक्तदान शिबिर सुद्धा आपण आयोजित करावे व विद्यार्थ्यांमध्ये रक्तदान संदर्भात असलेले गैरसमज दूर करून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी यात समावेशित होतील यासाठी प्रशासन, कर्मचारी ,व विद्यार्थी यांनी जनजागृती करावी एकूण 22 छात्र सैनिकांनी शिबिरात रक्तदान केले व 3 नियमित विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ मनोज शेवाळे जन, डॉ माधव कदम डॉ दिनेश देवरे, डॉ उपेंद्र धगधगे, डॉ तारक दास, डॉ स्वप्निल मिश्रा, डॉ एम आर पाटील आदींनी परिश्रम घेतले. रक्तदानाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्ट डॉ.विजय चौधरी यांनी केले.