नंदुरबार l प्रतिनिधी
संजय घोडवत विद्यापीठ, कोल्हापूर येथे १६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत नाशिक विभागातील नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास १७ वर्षातील मुलांच्या वयोगटात रौप्य पदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली,
ह्या संघाने पहिल्या सामन्यात पुणे विभागाचा 12-7 ने तर दुसऱ्या सामन्यात 12-5 ने पराभव करीत अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली ह्या सामन्यात कोल्हापूर विभागाकडून पराभव स्वीकारत रौप्य पदक प्राप्त केले, मागील वर्षीही शाळेच्या संघाने अशीच कामगिरी करत कांस्यपदक प्राप्त केले होते पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात 17 वर्ष वयोगटात प्रणव गावित तर 19 वर्ष वयोगटात ईश्वर रामोळे ह्या खेळाडूंची निवड झाली आहे.
ह्या विजयी संघात पदमेश वसावे,प्रणव गावित,आलोक पाडवी, प्रजल गावित,अंकित वळवी,संचय गावित,भुषण पवार,सौरभ राजपूत, संदीप पावरा,आलोक पाडवी, सागर तडवी ह्या खेळाडूंचा समावेश होता ह्या संघास क्रीडाशिक्षक मिनल वळवी, सतिष सदाराव,शारदा पाटील,खुशाल शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले सदर संघाचे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी,शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,पर्यवेक्षक मिनल वळवी आदींनी कौतुक केले.








