शहादा l प्रतिनिधी
भारतीय संविधान सर्वांना समान न्याय, अधिकार व हक्क बहाल करणारे आहे.मात्र सध्याचे केंद्रातील सरकार हे संविधान मोडून काढण्यासाठी छुपा अजेंडा राबवत आहे. सर्वांना समतेचा संदेश देणारे संविधानाऐवजी मनुस्मृतीवर आधारीत संविधानाचा ढाचा मोदी सरकारने तयार केला आहे.मनुस्मृतीचे पुनरूज्जीवन करण्याचा बेत वेळीच हाणून पाडण्यासाठी तयार रहा, असे आवाहन रायगड येथील सर्वहारा जनआंदोलनाच्या प्रमुख श्रीमती उल्काताई महाजन यांनी केले.
शहरातील प्रांताधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात त्या मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, धडगाव पंचायत समितीच्या सदस्या नीमाताई पटले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, माजी उपनगराध्यक्षा उषाताई अरविंद कुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.सुरेश नाईक, रिपाइंचे माजी तालुकाध्यक्ष यादव कुवर,नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत,चेतन साळवे, रिपाइंचे नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख अनिल कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,जनार्थच्या रंजना कान्हेरे, विद्रोही कवी दादाभाई पिंपळे, काॅ.ईश्वर पाटील, चंद्रसिंग बर्डे,
सोनवदचे माजी सरपंच राजेंद्र वाघ, माजी पंचायत समिती सभापती वनिता पटले, काॅ.सुनील गायकवाड, वंचितचे गजेंद्र निकम,रवि मोरे, अपंग कल्याण संस्थेचे शिवाजीराव मोरे, सुनील शिरसाठ, नरेंद्र महिरे, नरेंद्र कुवर, संतोष कुवर,बापू घोडराज, डॉ.मणिलाल शेल्टे,करूणा बैसाणे, डॉ.अजहर पठाण, शांतीलाल अहिरे,चुनिलाल ब्राह्मणे, रतीलाल सामुद्रे आदिंची मंचावर उपस्थिती होती.
अचानक आलेल्या भर पावसात श्रीमती उल्काताई महाजन यांनी सुमारे तासभर केलेल्या भाषणात संविधान जनजागृतीसह केंद्र व राज्य सरकारच्या भूमिका,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या संविधान विरोधी अजेंड्यावर माहिती दिली.त्या म्हणाल्या, संविधान मोडून काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.या शक्तींना रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान विरोधी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपली ताकद दाखवून द्यावी.महिलांसह वंचितांवर अन्याय करणारी मनुस्मृतीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहन केले.त्याच मनुस्मृतीवर आधारीत संविधानाचा ढाचा मोदी सरकारने तयार केला आहे.

भूक,भय, दंगल,नोटबंदी, हिंदूराष्ट्र, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, इतिहास, कोरोना, लाॅकडाऊन आदि विविध विषयांवर श्रीमती महाजन यांनी सुमारे तासभर विवेचन केले.अध्यक्षीय समारोपात सुहास नाईक यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले,अभी नहीं तो कभी नहीं हा मंत्र समोर ठेवून उपस्थितांनी येत्या काळात संविधान विरोधी पक्ष व शक्तींना सत्तेपासून दूर ठेवावे.
तत्पूर्वी एलिसा दिलवर पावरा या शालेय विद्यार्थीनीने संविधान गीत सादर केले.शेवटी संविधानावर आधारीत स्फूर्ती गीत नेहा इंदवे हिने म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादाभाई पिंपळे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील पाटोळे व रघुनाथ बळसाणे यांनी केले.परिचय रंजना कान्हेरे यांनी करून दिला. आभार नरेंद्र महिरे यांनी मानले.
दरम्यान, प्रारंभी दोंडाईचा-खेतिया बायपास रोडवरील संविधान चौकापासून रॅली काढण्यात आली.संविधान ग्रंथ पालखीसह शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित महिला व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.सुमारे एक हजार मीटर लांबीचा तिरंगा रॅलीत आकर्षण ठरला. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पवार, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ.सुरेश नाईक, संचालक मयूरभाई दीपक पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर,वन विभागाचे निवृत्त अधिकारी एन.जी.पटले, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, मंदाणेचे माजी उपसरपंच अनिल भामरे, भारत राष्ट्र समिती जिल्हाध्यक्ष मनलेश जायसवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ.मणिलाल शेल्टे, पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, हिरालाल रोकडे, रूपेश जाधव, बापू घोडराज आदिंची उपस्थिती होती.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
महिला किसान हक्क मंच, प्रशिक बहुउद्देशीय मंडळ, चर्मकार नौकदार मित्र संघ, लोकजागर समिती, आदिवासी एकता परिषद, इब्टा शिक्षक संघटना, भिलवंश ग्रुप,बिरसा फायटर, सिद्धार्थ युथ क्लब, मंदाना, क्रांतिवीर खाज्या नाईक युवक मंडळ, बुध्दीस्ट कर्मचारी संघटना, आदिवासी सरपंच संघटना, आदिवासी पवार समाज उन्नती मंडळ, बी-बॉईज ग्रुप, शहादा, फुले-आंबेडकर स्टडी सर्कल, सिध्दार्थ युवा मंच, शहादा, नर्मदा बचाव आंदोलन, सलोखा समिती नंदुरबार, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, जातीअंत संघर्ष समिती, पंचशिल मित्र मंडळ, शहादा, बुध्दीस्ट ग्रामसेवक संघटना, राजमाता रमाई महिला मंडळ, समता परिषद, एकलव्य संघटना, श्रमिक मुक्ती दल, जयभिम नवयुवक मंडळ, अण्णाभाऊ साठे युवक मंडळ, नागसेन नगर मित्र मंडळ आदि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.








