नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील अन्नपूर्णा पापड उद्योगाचे संचालक विनोद रावण पाटील यांना उद्यम इन्फो सोल्युशन्सतर्फे छ. संभाजीनगर या उद्योजकतेच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमार्फत राज्यस्तरीय उद्यम सह्याद्री पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पुरुष उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने “उद्यम सह्याद्री” पुरस्काराचे आयोजन दरवर्षी केले जाते. शहरातील गुरुकुलनगरमधील अन्नपूर्णा पापड उद्योगाचे संचालक विनोद रावण पाटील यांचा उद्योजकतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदरील पुरस्कार छ. संभाजीनगर मधील नामांकित उद्योजिका ग्राइंड मास्टर संचालक मोहिनी केळकर यांचे हस्ते तसेच भारत सरकारच्या सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग विकास संस्थेचे संचालक एन. एन. इस्टोलकर,मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन वाळूज महिला विभाग प्रमुख सुनीता राठी, यांचे उपस्थितीत छ. संभाजीनगरच्या औरंगपुरामधील स्व.विजयेंद्र काबरा स्मृती सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी उद्यम इन्फो सोल्युशन्स प्रा. ली. चे संस्थापक संचालक उल्हास भाले, दीपा भाले,
कार्यक्रम समन्वयक तुषार जहागीरदार तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








