नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेश किसान काँग्रेस विभागाची शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात नंदुरबार जिल्हापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थिती होणार असून
यावेळी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार, विविध सेलचे पदाधिकारी, जि.प. सदस्य, ग्रा.पं.सदस्य, नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस किसान विभागाचे प्रांताध्यक्ष पराग पाष्टे ,काँग्रेस किसान विभागाचे प्रदेश सचिव देवाजी चौधरी यांनी दि.२५ रोजी नंदुरबार येथील जुन्या पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. धान,कापूस, ऊस, सोयाबीन व इतर पिकांच्या पिकविम्याची रक्कम अजुनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळ शेतकन्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तीळमात्र लक्ष द्यायला तयार नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून राज्यातील शेतकऱ्याच्या विविध समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अंतर्गत असलेला प्रदेश किसान काँग्रेस विभागाची दि.४ ते ११ डिसेंबर २०२३ या दरम्यान शेतकरी संवाद यात्रा होणार आहे, ही दि.४ डिसेंबर २०२३ रोजी नंदूरबार जिल्ह्यातून सुरू होऊन दि.११ डिसेंबर २०२३ रोजी या यात्रेचे मोर्चात रूपांतर होऊन नागपूर येथे संपन्न होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. के.सी. पाडवी, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हाध्यक्ष व आ.शिरीषकुमार नाईक, सुभाष पाटील, दिलीप नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते ब शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.








