शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव स्तरीय आंतर विभागीय वेट लिफ्टींग व पॉवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील कु.जागृती पाटील या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.
कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा जि.जळगाव येथे संपन्न झालेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादाच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील खेळाडू कु.जागृती संतोष पाटील हिने वेट लिफ्टींग व पॉवर लिफ्टींग स्पर्धेत दुहेरी सुवर्ण पदक पटकावले.
सदरील खेळाडूची राष्ट्रीयस्तरीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरीता विद्यापीठ संघात निवड झाली आहे. सुवर्ण पदक विजेती कु. जागृती संतोष पाटील हीचा सत्कार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस.पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे उपस्थित होते.तिच्या यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम. के. पटेल, डॉ.एस.डी. सिंदखेडकर, प्रा.कल्पना पटेल, डॉ.महेश जगताप, डॉ.जी.एस.गवई, प्रा.जितेंद्र माळी, सुनिल भांडारकर यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.








